<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोकणात नुकत्याच झालेल्या वादळ व अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून खूप मोठ्या प्रमाणात कोकणवासीयांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे बाधीत झालेल्या आपदग्रस्ताना केंद्रीय सरकारकडून भरघोस आर्थिक मदत त्वरीत मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी पश्र्चिम बंगाल, ओरीसा अशा राज्यांमध्ये झालेल्या हानीसाठी केंद्र सरकारने, पंतप़धानानी धाव घेऊन आपदग्रस्ताना त्वरीत मदत व सहकार्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोकणात जावून नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्ताना भेटून त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रातील खासदार, मंत्री महोदयांनी कोकणवासीयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प़यत्न करणे गरजेचे आहे, असे मत चिपळूण तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनी मांडले आहे
‘महाराष्ट्राचे माननीय माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी आपदग्रस्ताविषयी तक्रारीचा सूर लावण्याऐवजी आपले वजन, प़तिष्ठा वापरून केंद्राकडून कोकणवासीयांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी रास्त अपेक्षा गरीब कोकणी माणूस करीत आहे. सध्याच्या कोरोना महामारी संकटात महाराष्ट्र मोठ्या आर्थिक अडचणीत असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा
एकजूटीने कोकणी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची गरज आहे. निदान जीवघेण्या आपत्तीच्या वेळी तरी राजकारण बाजूला ठेवण्याचा सूज्ञपणा आता सर्वांनीच दाखविणे गरजेचे आहे, असे आग्रही मागणी मराठा मंडळ, मुलुंडचेही अध्यक्ष असलेले रमेश शिर्के यांनी यानिमित्ताने केली आहे.