<
फैजपूर(किरण पाटिल)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात नागरिकांसाठी थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सीजन व पल्स तपासणी मोहीम फैजपूर जि.प. मराठी शाळा येथील शिक्षक-शिक्षिका राबवित आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी तोंडाला मास्क लावा, हात सतत धुवा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, घरातच रहा, या सूचना वेळोवेळी प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. त्यांचे पालन करावे, बाहेरगावाहुन आपल्याकडे कुणी आल्यास प्रशासनास कळवा. शहरात नागरिकांची थर्मल सकॅनिंग व ऍक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन व प्लस तपासणी करण्यात येत आहे. कॉलनी भागासह संपूर्ण शहरात नागरिकांची तपासणी जि.प.फैजपूर मराठी शाळेचे शिक्षक-शिक्षिका मोहीम राबवित आहे. या मोहिमेत कॉलनी भागासह संपूर्ण शहरात तापसणी सुरू आहे . तपासणी करतांना शिक्षिका सविता साळुंके, मिनाक्षी फेगडे जि.प.मराठी मुलांची शाळा, फैजपूर आदी सहभागी होते. नागरिकांनी घरीच राहावे, सुरक्षित रहावे जागरूक रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपण सुरक्षित, तर देश सुरक्षित..! असे आवाहन नागरिकांची तपासणी करणारे शिक्षक-शिक्षिका करीत आहे.