Friday, July 11, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 11 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीची उपलब्धता : जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2020
in राज्य
Reading Time: 2 mins read
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडून प्राप्त SDRF निधीतील 1 कोटी 77 लाख 33 हजार रूपयांचे तर

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 1 कोटी 28 लाख 55 हजार रूपयांचे वितरण

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर यंत्रणांना बळकटीकरणासाठी दिला निधी

नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बळकटीकरण व व्हीआरडीएल प्रयोगशाळेची उभारणी करणे आदी कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत 11 कोटी 82 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर मा. आयुक्त यांचेकडून प्राप्त निधीतील 1 कोटी 77 लाख 33 हजार तर जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 1 कोटी 28 लाख 55 हजार रूपयांचे वितरण जिल्ह्यातील विविध यंत्रणांना वितरीत केले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत 70 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉटसॲपवर फिरत आहे. हे वृत्त तथ्यहीन, निराधार असून कोणीही असे चुकीचे संदेश प्रसारित करू नये. त्याचबरोबर नागरिकांनीही अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

त्याचबरोबर या संदेशाच्या अनुषंगाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदस्य, तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत.

या समितीच्या मान्यतेने आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या निधीची माहिती अशी :


उपाययोजना यंत्रसामग्री खरेदी करणे : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उपलब्ध निधी 58 लाख 56 हजार रुपये. या निधीतून कोविड -19 उपाययोजना यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक यांना 74 लाख 87 हजार रुपयांचा निधी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी देण्यात आला आहे. तसेच अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनाही यंत्रसामग्री खरेदीसाठी 2 कोटी 44 लाख 66 हजार रुपयांचा निधी 2019 -20 या आर्थिक वर्षांत उपलब्ध करून दिला आहे.

2020-21 मध्ये उपलब्ध करुन दिलेला निधी :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास बळकटीकरण करणांतर्गत VRDL LAB उभारणीसाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना 59 लाख 17 हजार रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या VRDL प्रयोगशाळेत यूपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 18 लाख 52 हजार रुपयांचा निधी दिला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 1 कोटी 33 लाख 64 हजार रुपयांच्या निधी बळकटीकरणांतर्गत दिला. वॉर्ड क्रमांक 14 (आयसीयू) चे वॉटर प्रुफिंग, दरवाजे खिडक्या, स्वच्छतागृह, शेड बांधकाम, काँक्रिट रोड, स्टील पाईप, रेलिंग, फॉल्स सीलिंग, पार्टिशन टाकून कक्ष तयार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 33 लाख 70 हजार रुपयांचा निधी दिला आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी VRDL लॅब मधील विविध यंत्रसामुग्री करीता व्होल्ट स्टेबिलायझर बसविणे, वॉर्ड क्रमांक एक मध्ये नवीन आयसीयूकरीता 10 केव्ही यूपीएस व वीज संच मांडणी करणे, याच वॉर्डात वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करणे, आयसीयूकरीता 10 केव्ही यूपीएस व वीज संचाची मांडणी करणे, वॉर्ड क्रमांक 14 मधील आयसीयूकरीता वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करणे, याच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये आयसीयूजवळील नर्सिंग स्टेशनकरीता वीज संच मांडणी करणे, विविध विभागांमध्ये सीलिंग फॅन, पेडेस्टेबल फॅन, एक्झॉस्ट फॅन बसविणे आदी कामांसाठी 28 लाख 28 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील 50 खाटांच्या आयसेलोशन वॉर्डकरीता मेडिकल गॅस पाईपलाईन सीस्टिम (MPGS) कार्यान्वित करण्यासाठी 1 कोटी 25 लाख 18 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील नवीन बांधण्यात आलेले VRDL प्रयोगशाळेकरीता ८२.५ KVA क्षमतेचा D.G.Set शेडसह व एक अतिरिक्त A.C बसविण्यासाठी १० लाख ९६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 करीता मेडिकल स्टोअर मध्ये वातानूकुलित यंत्रणा बसविणे व ऑक्सिजन प्लॉन्ट (व्हेन्टिलेटर कक्ष) करीता विद्युत केबल टाकण्यासाठी 3 लाख 35 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रित करण्यासाठी प्रतिरोधक यंत्रसामग्री तसेच तद्नुषंगिक 18 बाबींच्या खरेदीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 1 कोटी 28 लाख 71 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.


कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रित करण्यासाठी प्रतिरोधक रसायने, केमिकल्स, ग्लासवेअर, कंझ्युमेबल्स वस्तू व तदनुषंगिक 80 बाबींच्या खरेदीसाठी 1 कोटी 71 लाख 83 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोविड -19 करीता इंजेक्शन खरेदीसाठी 9 लाख 26 हजार रुपये, कोविड -19 करीता विविध तीन बाबींच्या खरेदीसाठी 5 लाख 26 हजार रुपये, कोविड -19 Computer Radiography Machine -2 खरेदीसाठी 20 लाख रुपये.

कोविड 19 करीता वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील आयसेलोशेन वॉर्डकरीता मेडिकल गॅस पाईप लाईन (Vaccum plant and Line on off Valves) बसविण्यासाठी 40 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शासकीय रुग्णालयातील आय वार्ड क्रमांक एक व दोनच्या कोविड-19 करीता आयसोलेशन वार्डमध्ये रुपांतर करण्यात येत असल्याने नवीन वीज संच मांडणी करणे, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात कोविड -19 नियंत्रण कक्षकरीता नवीन वीज संच माडणी करणे, बोदवड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतील आयसोलेशन वार्ड क्रमांक 1 ते 3 मध्ये नवीन वीज संच मांडणी करणे, बोदवड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय इमारतीतील विविध वार्ड कोविड -19 करीता वापरण्यात येणार असल्याने नवीन वीज संच मांडणी करणे, बोदवड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील तीन डॉक्टर / कर्मचारी निवासस्थानाचे कोविड -19 करीता वापर करण्यात येणार असल्याने नवीन वीज संच मांडणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना 13 लाख 14 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोविड-19 करीता जळगाव येथील महिलांच्या 100 खाटांच्या रुग्णालयाकरीता अति उच्च दाब उपरी तार मार्ग विद्युत वाहिनी उभारण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सकांना 7 लाख 7 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाकरीता कोविड -19 प्रादुर्भाव उपाय योजना करण्यासाठी V.M. Kit Double Flocked ( 50 Test) Cap. Oseltamavir ७५ mg खरेदी करण्यासाठी 15 लाख 26 हजार रुपये, कोविड -19 अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयासाठी औषध व साधन सामग्री खरेदी करण्यासाठी 1 कोटी 31 लाख 18 हजार रुपये, कोविड -19 रुग्ण खासगी प्रयोग शाळेकडून तपासणी करून घेण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. Flow Emter with humidify bottle, Mask PVC Adult/pead,Tube with Nesal prong Adult/pead करीता 2 लाख 99 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे वातानूकुलित यंत्रणा, भुसावळ ग्रामीण रुग्णालय येथे वातानुकूलीत यंत्रणा व पंपाकरीता स्टार्टर व स्ट्रीट लाइट उभारणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना 4 लाख 44 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोविड -19 अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषध व साधन सामग्री खरेदी करण्यासाठी (एकूण 27 बाबी) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना 1 कोटी 95 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कोविड 19 च्या नियंत्रणासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचना व शासनाने ठरवून दिलेल्या समितीच्या मान्यतेने जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या कार्यपध्दतीचा अवलंब करून आतापर्यंत 11 कोटी 82 लाख 46 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

मा. आयुक्त यांचेकडून सन 2019-20 मध्ये 80 लाख रूपये प्राप्त झाले. त्यापैकी 73 लाख 91 हजार 600 वितरीत करण्यात आले. तर 53 लाख 91 हजार 600 रूपये खर्च झाले. तर उर्वरित 26 लाख 8 हजार 400 रूपये समर्पित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर सन 2020-21मध्ये मा. आयुक्त यांचेकडून प्राप्त निधी 1 कोटी 75 लाख असून त्यापैकी 1 कोटी 3 लाख 41 हजार 430 रूपयांचे विविध यंत्रणांना वितरण करण्यात आले आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव 11 लाख 50 हजार, तहसिलदार, अमळनेर 1 कोटी 50 लाख, तहसिलदार, भुसावळ 11 लाख 60 हजार, तहसिलदार, पाचोरा 10 लाख, आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव 5 लाख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव 2 लाख 50 हजार, तहसिलदार, चोपडा 5 लाख, तहसिलदार, भडगाव 5 लाख, तहसिलदार, एरंडोल 2 लाख 63 हजार 200, केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव 99 हजार 330, छाबरा एजन्सीज, जळगाव 50 हजार, साईनाथ ट्रॅव्हल्स 15 हजार, काबो सर्व्ह 3 हजार 900, तहसिलदार, रावेर 1 लाख 25 हजार, तहसिलदार, यावल 1 लाख, तहसिलदार,जामनेर 1 लाख 25 हजार, तहसिलदार, जळगाव 1 लाख, तहसिलदार, मुक्ताईनगर 5 लाख, तहसिलदार, धरणगाव 2 लाख 50 हजार, तहसिलदार, पारोळा 2 लाख 50 हजार, तहसिलदार, बोदवड 5 लाख 50 हजार, तहसिलदार, चाळीसगाव 5 लाख, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव 8 लाख 50 हजार याप्रमाणे वितरीत करण्यात आला आहे.

तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत कोरोना संशयीत व कोरोना ग्रस्त रुग्णांकरीता आवश्यक उपाययोजना करणेकरीता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांची माहिती – अधिक्षक अभियंता, सार्वनिक बांधकाम मंडळ, जळगाव, जळगाव शहर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे तळमजल्यावर 20 खाटाचे अतिदक्षता विभाग व पहिल्या मजल्यावर 60 खाटाचे lsolation Word करीता मेडीकल गॅस पाईप लाईन सिस्टीम (MGPS) बसविणेबाबत 1 कोटी 28 लाख 55 हजार प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली व निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव, ग्रामीण रुग्णालय, धरणगावसाठी साहित्य सामुग्री खरेदी करणेसाठी 70 लाख 20 हजार, ग्रामीण रुग्णालय, रावेरसाठी साहित्य सामुग्री खरेदी करणेसाठी 20 लाख 50 हजार, ग्रामीण रुग्णालय, चोपडासाठी 20 लाख 50 हजार यांना फक्त प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. संबंधित यंत्रणेने अद्याप निधीची मागणी केलेली नाही.

प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली रक्कम एकूण 2 कोटी 39 लाख 75 हजार व निधी वितरीत करण्यात आलेली रक्कम रुपये 1कोटी 28 लाख 55 हजार अशी आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध कार्यान्वयीन यंत्रणांना मागणी व आवश्यकतेप्रमाणे निधी वितरित केला जातो सदरचा निधी शासनाने विहित केलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे खर्च करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे.

त्यामुळे समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच कोणीही नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होईल अशी माहिती, संदेश प्रसारित करू नये. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४० कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

‘स्नेहाची शिदोरी’ संदर्भात जळगावकरांना नम्र आवाहन

Next Post
‘स्नेहाची शिदोरी’ संदर्भात जळगावकरांना नम्र आवाहन

'स्नेहाची शिदोरी' संदर्भात जळगावकरांना नम्र आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications