<
जळगांव(प्रतिनीधी)- सेवक सेवाभावी संस्था जळगाव तर्फे कोरोना महामारीच्या काळात ज्या, कोरोना योद्धा, स्वास्थ कर्मचारी, प्रशासनातील कर्मचारी, वैद्यकिय कर्मचारी, पत्रकार, समाज सेवक, संस्थेनी सामाजिक कार्य केले आहे अशा सर्व समाज सेवक-सेविका यांना हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार ५ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रदान करण्यात येईल. महाराष्ट्र गौरव पुरस्कार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समाजसेवी, पत्रकार, संस्था यांच्यासाठी आहे.त्यासाठी कोरोना महामारीच्या काळात २५ मार्च ते ३१मे च्या काळात कार्य केलेल्या अशा सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होण्यास मदत होते.या विचाराने सेवक सेवाभावी संस्था द्वारा कोरोना महामारी च्या काळात सामाजिक कार्य करण्यास पुढे आलेल्या कार्य करणार्या समाज सेवकांसाठी त्याचें कार्य निरंतर चालत रहावे व त्यांना प्रेरणा मिळत रहावी या उद्येशाने महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार* ने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कार चे स्वरुप प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे आहे, कोरोना महामारी मुळे कार्यक्रम घेता येणार नाही त्या कारणाने सेवक सेवाभावी संस्थे द्वारा निवड झालेल्या पुरस्कार्थींच्या शहरातील १ते २ प्रतिनिधी नियुक्त करून पुरस्कार्थींना त्यांचा निवासस्थानी जाऊन प्रतीनिधी द्वारा सन्मानित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संस्थाध्यक्ष विशाल शर्मा याच्यांशी ३० जुनच्या आधी संपर्क करावे असे कळवण्यात आले आहे.