<
धरणगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील बाभडे येथील पिंकी (काल्पनिक नाव) वय १७ वर्षे हिचा आज दि.१८ जून रोजी रविंद्र अशोक गावडे रा. हेडावे ता.अमळनेर येथील मुलाशी सकाळी ११ वा. विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन, जळगाव यांच्याकडून व्हाटसपद्वारे रात्री १० वाजता मिळताच अँड. प्रदीप पाटील, बाल कल्याण समिती जळगाव व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे चेतन पाटील (सामाजिक कार्यकर्ता)व पांडुरंग पाटील(समुपदेशक) व संरक्षण अधिकारी योगीता चौधरी व शरद सपकाळे यांच्या अशा दोन टीम मध्ये विभागणी करून मुलगा व मुली दोघीकडील ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून जन्म दाखले व माहिती घेऊन सदर बाल विवाह रोखण्यात आला व सदर अल्पवयीन बालिकेचे कुटुंबियांना समुपदेशन करून बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत पोलीस विभागाच्या मदतीने हमीपत्र लिहून घेण्यात आले व बाल कल्याण समितीत समक्ष आणण्यात आले.