<
उस्मानाबाद :- जिल्हा मोटर ड्राइव्हिंग स्कूल असोसिएशन, उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार लॉकडाऊनचे कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालू करण्यासखालील अटी व शर्तीच्या आधारे परवानगी दिली आहे.1. करोना विषाणूचा (covid-19) प्रादुर्भाव होणार नाही. या अनुषंगाने भारतसरकार, महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.2. उस्मानाबाद जिल्ह्यातील चालू असलेल्या व भविष्यात नव्याने निर्माण होणाऱ्याप्रतिबंधित क्षेत्रामध्ये (CONTAINMENT ZONE) मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालू ठेवण्यासपरवानगी असणार नाही.3. मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड,सॅनिटायझर, गॉगल्स इत्यादीचा नियमित वापर करावा.4. मोटार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देताना सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारकराहील. तसेच दोन प्रशिक्षणार्थी व एक प्रशिक्षक या व्यक्तींनाच वाहनामध्ये बसण्याचीपरवानगी राहील.5. मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे कार्यालयातील दरवाजांचे हँण्डल्स, नोब्स्, टेबल-खुर्चीइत्यादीचे तसेच प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे सातत्याने निर्जंतुकीकरण(Sanitization) करत रहावे.6. मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि सॅनिटायझरचा वापरकरावा. तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.7. कर्मचाऱ्यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.8. सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणदेण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी ग्राहकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.9. प्रशिक्षणार्थींना त्यांचे नाक व तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणे, ग्लोव्हज, फेसशिल्ड, सॅनिटायझर इत्यादीचा वापर करण्याबाबत सक्ती करावी.10. सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे इत्यादी कोविड-19 ची लक्षणेअसलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येऊ नये.11. सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे इत्यादी कोविड-19 ची लक्षणेअसलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे.12. परिवहन विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालनकरावे.13. मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स विषयक कामकाज केले जात असल्यास हे काम करत असताना नागरिकांची गर्दी होणार नाही व सामाजिक अंतरा (Social Distancing) चे पालन काटेकोरपणे होईल. यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स विषयक कामकाज करीत असताना बायोमेट्रिक उपकरणाचा वापर करण्यात येत असल्यास बायोमेट्रिक उपकरणाचे वारंवार (प्रत्येक नवीन वापरानंतर) निर्जंतुकीकरण(Sanitization) करावे.14. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. 31 मे 2020 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट-1 मध्ये नमूद केलेल्या कोविड-19 व्यवस्थापनासंदर्भातील राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.