<
जळगांव(प्रतिनीधी)- लाँकडाऊन काळात गोरगरीब व गरजवंताना धान्य देऊन “कृती फाऊंडेशनने” सामजिक बांधिलकी जोपासली आहे.
याबाबत सविस्तर असे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ”लॉकडाऊन ५” ३० जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर काही भागात अटी शर्तीवर शिथिलता देण्यात आली आहे. दरम्यान ऑरेंज, ग्रीन, रेड झोन अशा तीन भागात विभागण्यात आले आहे. जरी जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी शहरात शिथिलता देण्यात आली असली तरी सामान्य कष्टकरींची आर्थिक परिस्थिती अजूनही विस्कटली आहे. यामुळे कुटुंब प्रमुखाला आपल्या कुंटुंबाची उदरनिर्वाहासाठी ससेहोलपट होताना दिसत आहे. अशातच “कृती फाऊंडेशनच्या” वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील गरजुंना मदतीचा हात देण्यात आला आहे. यात बहुरुपी, गोसावी, चर्मकार अशा दुर्लक्षित घटकांना यावेळी सत्यमेव जयतेचे मुख्य संपादक दिपक सपकाळे यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबाना आधार मिळाला आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून त्यांनी समाजातील विविध घटकांना किराणा किट देत आर्थिक मदत केली आहे. तसेच फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात फिरून गरजू लोकांची माहिती गोळा केली व त्यानुसार त्यांना साहित्याचे वाटप केले, अशी माहिती यावेळी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सामाजिक अंतर पाळतानाच कोणती खबरदारी घ्यावी याविषयी त्यांनी जनजागृतीही केली. या उपक्रमासाठी दिवाकर सरोदे यांचे सहकार्य लाभले तर प्रसंगी फाऊंडेशन सचिव जी.टी. महाजन, अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष तथा पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, कार्याध्यक्ष तथा माधवबाग हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन, सत्यमेव जयते न्यूजचे मुख्य संपादक दिपक सपकाळे, चेतन निंबोळकर, कुणाल मोरे आदी उपस्थित होते.