Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार;पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार;पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय

कल्याण – मुंबईसह संपूर्ण एमएमआर प्रदेशात करोना साथीचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०० आयसीयू बेड्स आणि २०० ऑक्सिजन बेड्स वाढवण्याचा निर्णय शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी तातडीने जागेची निश्चिती करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन एक टीम म्हणून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मुंबईसह एमएमआर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अस्थायी रुग्णालयांची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात ठाण्यातील बाळकुम येथे एक हजार २४ खाटांचे अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेले रुग्णालय आणि नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटर येथे १२०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी आयसीयू, डायलिसिस सुविधा, एक्स रे, पॅथॉलॉजी आदी सर्व सुविधा असल्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यापाठोपाठ अंबरनाथ येथे ७०० बेड्सचे रुग्णालय आणि उल्हासनगर येथे ३०० बेड्सच्या रुग्णालयाचे लोकार्पणही श्री. शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले. डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुलातही २०० बेड्सच्या अस्थायी रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. शिंदे यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला. आचार्य अत्रे नाट्यगृह येथील सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड१९ रुग्णांकरिता बेड्सची संख्या वाढवण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हयगय न करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. तसेच, घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंगवर भर देण्यासही त्यांनी सांगितले. डोंबिवलीत पाटीदार सेंटर येथे क्वारंटाईन सेंटर, सावळाराम क्रीडा संकुलात कोविड रुग्णालय, कल्याण पश्चिम लाल चौकी येथे महापालिका इमारतीत क्वारंटाईन सेंटर, तसेच कल्याण पूर्व येथे सांस्कृतिक कला केंद्रात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे नियोजन असून त्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. डॉक्टर, परिचारिका, सपोर्टिंग स्टाफ यांचे मनुष्यबळ वाढवण्यात यावे, रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून १७ कोटी रुपयांचा निधी करोनाच्या मुकाबल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून गरज भासल्यास आणखीन मदत उपलब्ध करून देण्यात येईल, परंतु कोरोनाबाधित रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळण्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला. 
सदर बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, राजू पाटील, महापौर विनिता राणे, विरोधी पक्षनेते राहुल दामले, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे,  सभागृह नेते प्रकाश पेणकर, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विकास कामे जलद गतीने पूर्ण करा – पालकमंत्री सुनील केदार

Next Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त गरजेची -उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d