<
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परीषद उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन विकास भारत सरकार, आणि राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी ‘स्वच्छ महाविद्यालय अभियान’ या विषयावर एकदिवसीय ई- कार्यशाळा २४ जून रोजी सकाळी १० ते २ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेच्या नियोजनासाठी महाराष्ट्र राज्याचे संपर्क अधिकारी डॉ अतुल साळुंखे, कबचौउमवि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ पंकजकुमार नन्नवरे , जिल्हा समन्वयक डॉ विजय मांटे , नोडल ऑफिसर डॉ दिनेश पाटील व सर्व विभागीय समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे . मनिषा करपे या जलशक्ती कॅम्पस व जलशक्ती ग्राम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.