Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ”कोरोना वीर २०२०” पुरस्काराने योद्ध्यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ”कोरोना वीर २०२०” पुरस्काराने योद्ध्यांचा सन्मान

फैजपूर(किरण पाटिल)- गेल्या तीन महिन्यापासून आपलं कुटुंब, संसार सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना, नागरिकांसाठी प्रबोधन, बाधितांना वेळेवर अचूक योग्य उपचार यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करून रात्रंदिवस झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार  फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे  सावदा येथील जफर लॉन येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज होते. या कार्यक्रमात ‘मानवसेवा परमो धर्मः ही हाजी शब्बीर हुसेन हाजी अखतर हुसेन उर्फ बाबू शेठ यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन करण्यात आले. भुसावळ येथील प्रसिद्ध आर्किटेक्चर भावेशभाई टाक यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम पंपचे संचालक तथा समाज प्रेमी, समाज सेवक बाबुशेठ यांनी कोरोना विषाणू च्या कार्यकाळात गेल्या तीन महिन्यापासून परप्रांतीयांसाठी तथा स्थानिक रहिवाशांसाठी केलेली सेवा चित्रफितीत दाखविली आहे.  बाबू शेठ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात बाबुशेठ, यावल रावेर विभागाचे प्रांत डॉ. अजित थोरबोले, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय राहुल वाघ, एपीआय प्रकाश वानखडे, डॉ. श्याम बारेला, महावितरणचे अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांचा ‘कोरना वीर २०२०’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी प्रत्येकाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, नगराध्यक्ष अनिताताई येवले, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजू चौधरी यांच्यासह चाळीस-पंचेचाळीस मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून हा कार्यक्रम मोठ्या थाटात घेण्यात आला. परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी यावेळी बाबुशेठ समाजासाठी जातीपातीच्या पलीकडे करीत असलेल्या निस्पृह कार्याचा त्यांनी गौरव केला. तसेच ‘मानवसेवा परमो धर्मः’ या लघुपटातून समाजात माणसाने कोणते कार्य करावे याचे प्रबोधन होईल.  सर्व समानार्थी ते करीत असलेले कार्य महत्वपूर्ण असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे  अध्यक्षीय  मनोगतात सांगितले. यावेळी प्रांत डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर पाटील सर तसेच उपस्थितांचे आभार ट्रस्टचे संचालक संजीव महाजन यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज जिल्ह्यातील ९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Next Post

फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध व निवेदन

Next Post
फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध व निवेदन

फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध व निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo