<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच राज्यात रक्त साठा मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे पुढे आले आहे. रक्तसाठा कमी झाल्यामुळे थॅलेसेमिया आणि रक्ताच्या इतर आजारांशी निगडीत रुग्णांना रक्त मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. सध्या लॉकडाऊन देखील काही प्रमाणात शिथिल झाल आहे. यामुळे राज्यातील सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हीच गरज लक्षात घेऊन शासनाच्या हाकेला प्रतिसाद देत कृती फाऊंडेशन व आदर्श नगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली. तसेच दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन, स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली गेली. या शिबिरात आदर्श नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह उपाध्यक्ष रवींद्र(बाळू) पाटील, राहुल पाटील, रुपेश पाटील, मयूर वाघ, रोहन कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, रुपेश सुतार, रितेश चव्हाण, रितेश पाटील, सुरज मदने, बबलू परदेशी, जितेंद्र शिंदे, रितेश विसपुते, परवेश तलरेजा, साहिल तलरेजा, पोस्टल कर्मचारी अविनाश रणधीर, व्ही.एस. पाटील, शिवाजी वाघ, सुनील बारी, तुषार कोल्हे तसेच कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन यांच्यासह सचिव जी.टी. महाजन, कार्यध्यक्ष डॉ.श्रद्धा माळी, डॉ.श्रेयस महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संदीप चौधरी, पत्रकार चेतन निंबोळकर, शनिपेठ पो.स्टे.चे अमोल विसपुते, निर्मिती फाऊंडेशनचे नितीन सपके, तुलसी जेलीचे आशुतोष पाटील यांच्यासह आदी ५० जणांनी स्वेच्छा रक्तदान केले तसेच फाऊंडेशनच्या वतीने आलेल्या प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षेसाठी मास्क दिले. या उपक्रमासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटचे डॉ. सोनवणे, टेक्निशयन अनिल भोळे, सिमा शिंदे, रुपाली बडगुजर, उमाकांत शिंपी, अनवर भाई यांचे विशेष सहकार्य लाभले. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. रक्तदान आहे जनतेची सेवा, त्यातून मिळेल आपणास मेवा असा अनोखा संदेश यावेळी फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला.