<
भडगांव शहरासह तालुक्यातील ४६ व पाचोरा येथिल ५ एकुण ५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.
डाँक्टर दिनाचा औचीत्य साधत बांबरूड येथिल कोविड सेंन्टर ला ( डाँक्टर ) व वैद्यकीय कर्मचारी ( कोराना योध्दा) यांचा आमदार किशोर आप्पा पाटील व उपविभागीय अधिकारी राजेन्द्रं कचरे यांच्या हस्ते सत्कांर करण्यात आला.
भडगाव शहरासह तालुक्यातील ४६ व पाचोरा येथिल पाच ऐकुण ५१ रुग्णांना आज दि.०१/ ०७/ २०२० सध्यांकाळी चार वाजेच्या समुरास, उपचार पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. तसेच त्यांना १४ दिवस होम कॉरन्टांइन राहण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे.
भडगांव वासियांसह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार माधुरी आंधळे,पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.पकंज जाधव, वैद्यकिय अधिकारी डाँ सुचिता आकडे, डॉ.प्रशांत पाटील, पाचोरा वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. प्रतिक भोसले डॉ.पुनम सांगवीकर, डाँ पुनम अहिरराव डॉ.निलेश पाटील, नायब तहसिलदार रमेश देवकर, नायब तहसिलदार मोतीराय,तलाठी राहुल पवार, ड्रायव्हर विष्णू तायडे,उपस्थित होते तसेच पत्रकार अशोक परदेशी, गणेश रावळ, नरेन्द्रं पाटील, अबरार मिर्झा, प्रमोद सोनवणे,यांच्या हस्तेही कोरोना मुक्त रूग्णांचा पुष्पं गुच्छं देवुन सत्कांर करण्यात आला, तर वैद्यकीय पथकातील श्रीकांत मराठे, ज्योती चौधरी, प्रमोद सतुके, डि.वाय.पाटील, किरण राठोड, मनोज वाघ, भैया महाजन,कुणाल कोळी, नी कोविड सेटंरला आपले मोलाचे योगदान देत कार्य करीत आहे तर भडगांव डॉक्टर आसोशियशनचे हि भडगांव कोरोना सेंटरला मोलाचे सहकार्य लाभत आहे.
तरी लॉक डाऊनच्या शिथिलतेत नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावे,मास्क लावावे व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.