<
भारतासह संपूर्णनजागवर कोरोनाचे संकट ओढवले आहे. प्रत्येक देश हा कोरोनासोबत निकार्ने लढत आहे. भारत देशामध्ये सुद्धा कोरोनाच्या धर्तीवर कडकडीत लोकडाऊन पुकारण्यात आला होता. देशांतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने कार्यशीलतेचे दर्शन घडवून आणले.
ऑल इंडिया सीफेरेर्स आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांच्या प्रयत्नाने फिलिपिन्स मध्ये अडकलेल्या १००० भारतीय नागरिकांच्या खलाशी (क्रू) मनिला (MON ) या जहाजावर गेल्या ४ महिन्यात पासून अडकून आहेत. तरी या प्रकारात लक्ष घालून त्यांचे लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे हि विनंती भारताचे नौकायन मंत्री, परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याना करण्यात आली आहे.
ऑल इंडिया सीफेरेर्स आणि जनरल कामगार युनियन च्या माध्यमातून वेळोवेळी नाविक, खलाशी तसेच बोटीवर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येबाबत सरकारसोबत समन्वय साधण्याचा तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्नशीलता दाखवली जाते. जगभरातील कित्येक नाविक तसेच खलाशी वेगवेगळ्या देशामध्ये अडकून होते तसेच भारतामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना मायदेशी परतण्याचे रस्तेसुद्धा बंद झाले होते. परंतु ऑल इंडिया सीफेरेर्स आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून सरकारसोबत समन्वय साधून हजारो नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याचा मार्ग सुखकर केला.