<
भडगाव शहरासह तालुक्यातील ३७ रुग्णांना आज दि. ०४/ ०७/ २०२० दुपारी एक वाजेच्या समुरास, उपचार पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर ३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तसेच त्यांना १४ दिवस होम कॉरन्टांइन राहण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे
भडगांव वासियांसह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, तहसीलदार माधुरी आंधळे, न. पा. मुख्याधिकारी विकास नवाळे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.पकंज जाधव, वैद्यकिय, डॉ.प्रशांत पाटील, डाँ प्रशान्त शेळके, डाँ सचिन पाटील, डॉ. प्रतिक भोसले, डॉ.पुनम सांगवीकर, , नायब तहसिलदार रमेश देवकर, तलाठी राहुल पवार, ग्रामसेवक दिपक पाटील,नोडल अधिकारी ऐ आर पाटील,संपर्क अधिकारी टी पी मोरे ,शिक्षक कर्मचारी दिपक भोसले, अविनाश भदाणे, नानाजी सावंत,विजय पाटील, ड्रायव्हर विष्णू तायडे, नगरपालिका कर्मचारी छोटु वैद्य, नितीन पाटील,तसेच पोलिस कर्मचारी पोलिस नाईक राजु सोनवणे,होमगार्ड चन्द्रकात पाटील,वैद्यकिय पथकातील महीला कमर्चारी भारती उखाहरणे, निलिमा माळी उपस्थित होते
तरी लॉक डाऊनच्या शिथिलतेत नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावे,मास्क लावावे व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.