<
जळगाव २९ जून २०२०: हंगामा डिजिटल मीडियाचे मालकीहक्क असलेले आघाडीचे व्हिडिओ ऑन डिमांड व्यासपीठ हंगामा प्ले ने आज मराठी व हिंदी भाषेमध्ये नवीन हंगामा ओरिजिनल शो भूताटलेला सादर केला. हा हॉरर-कॉमेडी शो रायबाच्या अवतीभोवती फिरतो, ज्याचा लवकरच विवाह होणार आहे. विवाहासाठी एक आठवडा असताना त्याचा सामना एका भूताशी होतो. यामुळे तो अशा स्थितीमध्ये अडकून जातो, जी त्याच्या नियंत्रणाबाहेर जाते आणि त्याच्या जीवनात गमतीदार गोंधळ निर्माण होतो. या शोमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार प्रियदर्शन जाधव, सुरभी हांडे आणि सायली पाटील आहेत. हंगामा डिजिटल मीडियासोबत सहयोगाने कॅफेमराठीची निर्मिती असलेला शो भूताटलेला चे लेखन अभिनेता-लेखक योगेश शिरसाट यांनी केले असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे.
या शोबाबत बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले भूताटलेला च्या कथानकामध्ये हॉरर व विनोदाचे सुरेख संयोजन आहे आणि हे कथानक विलक्षण व मनोरंजनपूर्ण आहे. आमचा वर्षाखेरपर्यंत विविध भाषा, शैली व स्वरूपांमध्ये १२ ते १४ ओरिजिनल शोज प्रदर्शित करत आमची लायब्ररी प्रबळ करण्याचा मनसुबा आहे.
भूताटलेला’सह डिजिटल पदार्पण करत असलेला प्रियदर्शन जाधव म्हणाला, पुन्हा एकदा शिवाजीसोबत काम करण्याचा चांगला अनुभव राहिला. या शोने मला माझ्या अभिनयासंदर्भात प्रयोग करण्याची मुभा दिली आणि मला डिजिटल विश्वामधील सर्वोत्तम पदार्पणासाठी यापेक्षा अधिक चांगली संधी मिळाली नसती. शोमधील माझी भूमिका दुविधेचा सामना करते आणि भयानक स्थितीप्रती त्याची प्रतिक्रिया खरेतर अत्यंत विनोदी आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना माझी भूमिका व शो खूप आवडेल.
आजपासून सुरू होणारा हा शो स्ट्रिमिंगसाठी हंगामाचे व्हिडिओ ऑन डिमांड व्यासपीठ हंगामा प्लेवर उपलब्ध असेल. भूताटलेला वोडाफोन प्ले, आयडिया मूव्हीज अॅण्ड टीव्ही, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक, टाटा स्काय बिंज, एमएक्स प्लेअर, सोनीलिव्ह आणि अँड्रॉईड टीव्हीवरील हंगामा प्लेच्या माध्यमातून स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच हंगामाचा शाओमीसोबतचा सहयोग ग्राहकांना मी टीव्हीवरील हंगामा प्लेच्या माध्यमातून शो पाहण्याची सुविधा देईल.