<
श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य च्या मागणीला यश व समाधान
प्रतिनिधी- कोव्हिड- 19 कोरोना सारख्या वैश्विक महामारी धर्तीवर रेमडेसीवीर औषधावर राजकारण न करता बांगलादेश प्रमाणे भारतातही रेमडेसिव्हिर औषध तयार करण्याबरोबरच मोफत वाटप करण्याची परवानगी बाबत श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांना व अर्थ मंत्री निर्मला सीतारामन, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आदींना या मागणीचे निवेदन इ मेल व्दारे पाठवून केलेली होती. अमेरिकेतील जिलाद सायन्सेस गीलेड सारख्या कंपनीने ज्या कंपनीने या आधी सुध्दा बर्ड फ्लूची साथ आली होती तेव्हा टैमी फ्लु औषध, लस तयार केली होती, शोधले होते त्यांनीच आता कोव्हिड- 19, कोरोना वर रेमडेसीवीर औषध शोधले होते तसेच या रेमडेसिव्हिर औषधाचा वापर बाबत अमेरिकेत तसेच WHO मध्ये सुद्धा मतभेद आहेत, तरीसुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी लोकांसाठी हे औषध वापरण्यास परवानगी दिली आहे.त्याच प्रमाणेभारतात हे औषध बनवण्यासाठी सुद्धा सिप्ला, ज्युबिलंट लाईफसायन्सेस, हैदराबादची हेटेरो ड्रगस आणि मायलँन या चार प्रमुख कंपन्यांनी तय्यारी दर्शविली आहे. तसेच भारतात DCGI ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांनी सुध्दा हे औषध वापरता येईल अशी परवानगी दिली असतानाही 2 जुन रोजी केंद्र सरकार आरोग्य खात्याची जी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सुद्धा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे औषध वापरायला परवानगी दिली आहे. तरी सुध्दा केंद्र सरकार यावर कुठलाच ठोस निर्णय घेत नाही त्या अनुषंगाने श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले होते. आज सरकारने महाराष्ट्र व दिल्ली सह ५ राज्यांना रेमडेसिव्हीर या कोरोना विषाणू वरील प्रायोगिक औषधाच्या २० हजार लहान बाटल्या पाठविल्या बाबत कळविले आहे. या औषधासाठी भारतात ‘कोव्हिफोर’ हे नाव निश्चित करण्यात आले असून तेलंगणा, गुजरात तसेच तामिळनाडू या राज्यांनाही या औषधाचा पुरवठा केला जाणार आहे. हैदराबाद येथील ‘हिटेरो’ या औषधनिर्माण कंपनीला ‘रेमडेसिव्हिर’ या प्रायोगिक औषधाचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली असून 100 मिलिग्रॅम बाटलीच्या औषधाची किंमत 5,400 इतकी आहे. औषधाची मात्रा प्रौढांसाठी पहिल्या दिवशी 200 मिलिग्रॅम आणि नंतर 5 दिवस दररोज 100 मिलिग्रॅम इतकी असेल. सध्या फक्त सरकार आणि हॉस्पिटलमार्फत हे औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. गर्भवती तसेच स्तनपान देणाऱ्या महिला, यकृत व मूत्रपिंड विकार असणारे रुग्ण, 12 वर्षांखालील मुलांना हे औषध देता येणार नसल्याचेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, हे औषध इंदूर, भोपाळ, कोलकाता, लखनौ, पाटणा, कोची, त्रिवेंद्रम, भुवनेश्वर, रांची, विजयवाडा आणि गोवा या ठिकाणी दुसऱ्या टप्य्यात पोहचवण्यात येणार आहे. या श्री संत सावता माळी युवक संघाच्या मागणी व पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याबाबत संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी समाधान व्यक्त केले.