<
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखी चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच आरोग्य यंत्रणेवरचा देखील ताण वाढला आहे. याच अनुषंगाने येथील मौलाना आझाद फाऊंडेशन, स्वामी समर्थ ग्रुप, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूड, सूर्या फाउंडेशन, सेवक सेवाभावी संस्था, कमल केशव प्रतिष्ठान, एल.के.फाउंडेशन, सच्ची निःस्वार्थ शक्ती सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीर तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात डॉ.सोनाली महाजन, डॉ.महेंद्र काबरा, डॉ.स्वाती सोनवणे, डॉ.नलिनी महाजन या तज्ञ डॉक्टरांची तसेच वैशाली काळे, धनश्री पाटील, किरण कोळी, दक्षता पाटील, आदिल शेख, शगफ शेख या सहकारी डॉक्टरांची सेवा उपल्ब्ध करण्यात आली होती. शिबीरात जवळपास ४०० लोकांनी उपस्थिती लावली. शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय होती तसेच सदर शिबीर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्यात आले. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली. शिबीरात खास करुन ताप, सर्दी, खोकला. अंगदुखी, अपचन, पोटच्या तक्रारी, डायबेटीज आणि सकस आहार याविषयीही तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी, व फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे यावेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सातत्यताने आयोजित करण्यात येतील असे आयोजकांमार्फत आश्वासित करण्यात आले. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अशाप्रकारे सकारात्मक प्रतिसाद असल्यास भविष्यातही अनेक आरोग्य शिबीर लावण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी यावेळी बोलून दाखवले. सदर शिबिरासाठी सुरज झंवर, अनिल कासट, अतुल पाटील, जिनल जैन यांचे अनमोल सहकार्य लाभले तर यावेळी भारती काळे, प्रतीक्षा पाटील, अर्चना सूर्यवंशी, हर्षाली पाटील, भारती म्हस्के, वर्षा पाटील, तनुजा मोती, फिरोज शेख, प्रशांत सूर्यवंशी, राजीव पाटिल, चेतन निंबोळकर, राकेश कंडारे, अँड. अभिजित रंधे तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबीरासाठी हेमंत सोनार, अविनाश घुगे तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यानंतर देखील आरोग्य शिबीर सुरु राहणार असून या शिबिरासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. अधीक माहितीसाठी फिरोज शेख ९९२३५८६७८६, भारती काळे ९११२०४७९३६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.