<
औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल च्या वतीने आयोजन
एरंडोल(प्रतीनिधी)- दिनांक १३ मंगळवारी रोजी नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल च्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शशिकांतहिंगोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक सभागृहात कविसंमेलन व औदुंबर भूषण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष अँड. मोहन बी शुक्ला यांनी दिली.सोहळ्यात ग्रामीण साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागूल तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळीऔदुंबर साहित्य रसिक मंच परिवारातील वशैक्षणिक ,साहित्यिक ,सामाजिक ,आरोग्य सेवा ,पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यातच किशोर पाटील कुंझरकर यांना राज्य शासनाचा व जिल्हा परिषद जळगाव चा आदर्श शिक्षक पुरस्कार लाभला ही बाब प्रेरणादायी असल्याने त्यांचा औदुंबर भूषण सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असे शुक्ला यांनी सांगितले.औदुंबर साहित्य रसिक मंचचे ज्येष्ठ कवी प्रा.वा.ना.आंधळे,कवी विलास मोरे,डॉ. बी.एन.चौधरी,डॉ.संजीव कुमार सोनवणे यांच्यासह परिसरातील नामवंत व नवोदित कवींचा यावेळी सहभाग असणार आहे.यशस्वीतेसाठी औदुंबर साहित्य रसिक मंचचे अध्यक्ष ॲड मोहन बी.शुक्ला व सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.शहरातील मान्यवर तसेच पत्रकार वर्गासह नवोदित कवींच्या यावेळी उपस्थिती राहणार असून,दुपारी ठीक दोन वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.