<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10:- जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाच्यावतीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत- योजना-डीपीसी 2019-2020 अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांकरीता जिल्हा उद्योग केंद्र आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या विविध संधी, योजनेबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी 15 जुलै रोजी ऑनलाईन समुपदेशन-मार्गदर्शन सत्राचे दुपारी 1 ते 2 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ऑनलाइन उपक्रमाची लिंक Google Meet वर शेड्युल केलेली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/qcy-mvoz-jqr या लिंकवर जाऊन सत्रामध्ये सहभागी व्हावे.
ऑनलाइन समुपदेशन/मार्गदर्शन सत्रात जिल्हा उद्योग केंद्र आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहून स्वयंरोजगाराच्या विविध संधी, योजनेबद्दल माहिती देणार आहेत.
तरी डीपीसी 2019-2020 अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेले व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा ला. तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.