<
कळंब, प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके) :- शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन दि. 31 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक 13 जुलै 2020 रोजीच्या 00.00 वाजेपासून दिनांक 19 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)अन्वये संचारबंदी लागू केली आहे. या आदेशातील मुद्दा क्र. 1 मध्ये किराणा दुकानांची वेळ चालू राहण्याची वेळ नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दिपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व किराणा दुकान सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत .या आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.