भडगाव(प्रतिनिधी)- नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भडगांव तालुकाध्यक्ष पदी स्वप्नील निकम, तालुका उपाध्यक्ष पदी निलेश नेरकर व तालुका सचिव पदी शुभम रणदिवे, तालुका सहसचिव पदी मयुर वाघ, चेतन राजपूत, ऋषिकेश बोरसे, योगिनी पाटील, तालुका समन्वयक पदी मयुर बोरसे, मयुर पाटील, तेजस पाटील, जयेश सोनार, तुषार परदेशी यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे, प्रदेशाध्यक्ष राहुल वाकलकर यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.