<
जामनेर/प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन, तहसिल विभाग,व सामाजिक कार्यकर्ते यांचा जळगांव जिल्हा निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने आज रोजी सन्मान-पत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जीवाची काळजी न घेता जामनेर तहसील विभाग, आरोग्य विभाग,व पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व कोरोना योद्धांचा निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने जळगांव जिल्हाध्यक्ष यांनी निर्णय घेऊन आज तहसीलदार-अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक-प्रताप इंगळे,ए-पी-आय-धरमसिंग सुंदरडे,ए-पी-आय-राजेश काळे,तसेच महिला पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी-डॉ-विनय सोनवणे,डॉ-राजेश सोनवणे,डॉ-मनोज विसपुते,आशा स्वयंसेवीका,गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट,चे अध्यक्ष-श्यामचैतन्य महाराज,मोहन भुवन”चे विनोदभाई लोढा, मस्तान भाई तडवी,विठ्ठल शेळके,होमगार्ड समादेशक-भगवान पाटील,व अन्य होमगार्ड यांचा सत्कार संघटनेचे जिल्हाध्यक्ष-सुनिल इंगळे, जामनेर तालुकाध्यक्ष-गजानन तायडे, शांताराम झाल्टे,अनिल शिरसाठ, नसीम शेख, बबलू शेख, साहेबराव साळुंके, या सर्व पत्रकारांनी निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने कोरोना-योद्धा म्हणून सन्मान-पत्र,सॅनिटायझर, मास्क, गुलाब पुष्प,व रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम-30 किट देऊन कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.