<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १८३व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २०० रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ५२५१ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५, (३४ RATI),( भुसावळ ०६, अमळनेर ०४, चोपडा २५, पाचोरा २०, भडगाव ० , धरणगाव १३, यावल ०४, एरंडोल ०३, जामनेर ३,(०९RATI), जळगाव ग्रामीण ०५,(०७RATI), रावेर ०२, (१०RATI), पारोळा १२,(०१ RATI), चाळीसगाव ०५, मुक्ताईनगर ०८, (०२RATI), बोदवड ०५, दुसर्या जिल्ह्यातील-०० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८१८७ इतकी झाली आहे.आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.