<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ४१८व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २१९ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ५४७० रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ८४, (३७ RATI),( भुसावळ २७,(०२ RATI), अमळनेर १०,(०५ RATI), चोपडा २८,(१७ RATI),पाचोरा १८, भडगाव ०२ , धरणगाव २१, (०४ RATI),यावल ०७, (०९ RATI), एरंडोल १०, जामनेर ६,(३२RATI), जळगाव ग्रामीण ०८,(०४RATI), रावेर ०९, (२४RATI), पारोळा ०४,(०१ RATI), चाळीसगाव ४४, मुक्ताईनगर ०१, (०१RATI), बोदवड ०१,(०२RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८६०५ इतकी झाली आहे.आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.