<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात केविड१९ या संसर्गजन्य आजाराच्या काळात ज्या नागरिकांचे रोजगार गेले व त्यांचे कुटुंब अर्थिक संकटात सापडले आहे. अशा श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या पालकांना एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत ३० किलो अन्न धान्याचे किट केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव यांच्या तर्फे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.सोसायटी अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष मनोज पाटील, प्रमुख पाहुणे केशवस्मृती प्रतिष्ठानचे आरोग्य अधिकारी भानुदास यवलेकर, विनोद पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कलाशिक्षक अविनाश घुगे यांनी केले. आभार धनराज पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन गाढे, रुपेश पाटील, प्रशांत महाजन, राकेश भागवत यांनी परिश्रम घेतले.