<
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोना व्हायरस या महामारीने येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांची होत असलेली वाढ थांबावी व कोरोना व्हायरस या रोगाला आळा बसावा या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या क्षेत्रात निरंतर कार्य करणाऱ्या संस्था एकत्र येऊन कोविड केअर हेल्प ग्रुप जळगाव या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करून शासनास अल्पस्वरूपात हातभार लावत आहे. तसेच पाळधी येथील आरोग्य शिबिरात ३०० नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतला. तसेच नागरिकांना मास्क, आर्सेनिक अल्बम गोळ्या, कोरोना बाबत जनजागृती पत्रके वाटप वाटप करण्यात आले. असेच आरोग्य शिबिर जळगाव जिल्ह्यात निरंतर घेण्यात येणार आहे असे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. सदर शिबीरासाठी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, मौलाना आझाद फाऊंडेशन, स्वामी समर्थ ग्रुप, सूर्या फाऊंडेशन, कामलकेशव प्रतिष्ठान, सेवक सेवाभावी संस्था, जे.सी.आय, भक्ती मेडिको, अमन रोटरी फाऊंडेशन, बागबान विकास फाऊंडेशन, सच्ची निस्वार्थ शक्ती सेवा या संस्थेच्या सहकार्याने पाळधी येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरात डॉ. शरीफ बागबान, डॉ. स्वाती सोनवणे यांनी सेवा दिली. पाळधी येथील उद्योजक शरद कासट, सुरज सुनील झंवर, अनिल कासट, पाळधीचे सरपंच चंदूलाल पाटील, प्रकाश पाटील व पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे यांनी या शिबिरास हजेरी लावली.प्रसंगी भारती काळे, फिरोज शेख, प्रतीक्षा पाटील, हर्षाली पाटील, अर्चना सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, वर्षा पाटील, विशाल शर्मा, भारती म्हस्के, जिनल जैन, राकेश कंडारे, राजीव पाटील, अँड. अभिजित रंधे, चेतन निंबोळकर, गोपाळ सोनवणे, भूषण महाजन, आदी उपस्थित होते. हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या आरोग्य सेविका व नोबल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.