<
जळगाव :जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ३१२व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २१४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ६५०५ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ४१,(०० RATI),भुसावळ ०९,(०१ RATI), अमळनेर १९,(०६ RATI), चोपडा ०९,(१७ RATI),पाचोरा ०१, (०७ RATI), भडगाव १०,(०१RATI), धरणगाव ०७, (०७RATI),यावल ०२, (०८ RATI), एरंडोल ०३, जामनेर ५८,(०५RATI), जळगाव ग्रामीण १०,(०१RATI), रावेर ०४, (०९RATI), पारोळा १५,(०२ RATI), चाळीसगाव ४३, मुक्ताईनगर १२, (०१RATI), बोदवड ०१,(००RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०२, (०१ RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १००४४ इतकी झाली आहे.आज ०२रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३०७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.