<
जळगांव(धर्मेश पालवे):-फळे व भाजीपाला मार्केट हमाल मापाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व विविध सामजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करून नम्र निवेदन दिले.ज्यात ७ऑगस्ट रोजी हमाल मापाडी संघटनेचे नेते मा धुडकू भाऊ सपकाळे व सहकारी वर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध तसेच हल्लेखोर समाजकंटक व गावगुंड यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे नमूद आहे.सदर हल्लेखोरावर विविध पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळी गुन्हे दाखल असून या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर खंडणी सारखे गुन्हे दाखल करावे,व आम्हाला न्याय द्यावा असेही म्हटले आहे.या आशयाचे निवेदन या निदर्शनात सहभागी विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात हे निवेदन देण्याआधी कार्यालय समोर जोरदार घोषणाबाजी देत ,सदर गुन्हेगाराचा निषेध व्यक्त करत जिल्हा पोलिस व जिल्हाधिकारी व जनतेचे लक्ष वेधूले होते.याकरिता मा संजयभाऊ सपकाळे -जनरल कामगार संघटना, मा मुकुंद भाऊ सपकाळे-बहुजन क्रांती मोर्चा,भारत ससाणे-लोकशाही बचाव संघर्ष समिती,बहुजन वंचित आघाडी व आर पी आय आदी सामाजिक संघटणेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.