<
जळगांव(प्रतिनिधी)- आज रोजी भारतातील महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी विद्यालयात ऑनलाइन पद्धतीने पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच विद्यार्थ्यांना ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनपटा विषयी माहिती व्हावी म्हणून इयत्ता निहाय केलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर पीडीएफ स्वरूपात माहिती पाठविण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घरीच मोबाईलवर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चे फोटो ग्रुप वर पाठवले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पालकांनीही त्यांना मदत केली तसेच इयत्ता आठवीची विद्यार्थिनी वैष्णवी निकुंभ हिने अब्दुल कलाम यांचे चित्र सुंदररित्या रेखाटले विद्यार्थ्यांमध्ये शुभम राठोड, विकास राठोड, दीपाली चव्हाण, राकेश गायकवाड, मेघराज पाटील, प्रशांत कवळे, कृष्णा मराठे,जयेश बाविस्कर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश महाजन, रूपाली वानखेडे, नरेश कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.