<
धरणगाव(प्रतिनिधी)-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क व हात स्वच्छ ठेवण्यासाठी हाताला सॅनिटायझर लावणे गरजेचे असल्यामुळे तसेच मास्क व सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. यात पोलीस बांधव सलग चार महिन्यापासून आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता देश सेवेसाठी झटत आहेत. त्यांचे मनोबल वाढवून त्यांना आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांचा मुलगा प्रसन्नच्या वाढदिवसानिमित्त मास्क, सॅनिटायझर मशीन वाटप करण्यात आले. याचबरोबर पत्रकार बांधव व बँक कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी यावेळी मास्क, सॅनिटायझर मशीनचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रसंगी सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक निलेश साळुंके, अंजुल मालवीयर, निशा नैथानी तसेच पाळधी पोलिस स्टेशनचे सपोनी श्री.गायकवाड, अपोलो टायरचे व्यवस्थापक स्वप्निल उपाध्याय, शाळेचे अध्यक्ष अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझर आणि मास्क मिळाल्याने समाधान व आभार व्यक्त केले.