<
जामनेर /प्रतिनिधी –अभिमान झाल्टे
जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला कोरोनाच्या महामारीत वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना खरिप पिकांसाठी लागणाऱ्या युरियाचा खाजगी साठे बाजांमुळे उपलब्ध असुन सुद्धा युरिया शेतकऱ्यांना दिला जात नाही किंवा युरिया देतांना सोबत दुसरं खत विकत दिले जाते आणि युरियाचा अव्वाच्या सव्वा भाव सांगुन शेतकऱ्याची लुट जर सर्रासपणे होत असेल तर त्या खाजगी दुकानदार तसेच लुट करणाऱ्या लुटारु साठे बाजांवर आता संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने त्यांना अद्दल घडवेल त्याचप्रमाणे तालुक्यातील हा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना होत असलेली पिळवणूक पहिले शासन दरबारी मांडली तहसिलदार यांच्या वतीने लवकरात लवकर युरिया व रासायनिक खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून व कष्टकरी शेतकरी राजाची खाजगी कृषी केंद्रांकडुन होणारी लुट थांबवावी व साठे बाजारांवर वेळीस जप्तीची शस्त्रे उजगारुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा
नाही तर
आम्ही आहोतच पुढील कारवाई ला तय्यार …
अशा आशयाचे या संदर्भात आज 28 जुलैला जामनेर तालुका संभाजी ब्रिगेड तर्फे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील ,जिल्हाप्रमुख( प्रचार प्रसार) मनोजकुमार महाले ,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गायके,जिल्हासरचिटणीस अमोल पाटील,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील सर ,शहराध्यक्ष विशाल पाटील ,ता.सरचिटणीस प्रविण गावंडे,बेटावद गटप्रमुख अजय मराठे,राम अपार,प्रभाकर साळवे, मा.नगरसेवक माधव चव्हाण ,आतुल सोनवणे,अमोल ठोंबरे,सुनिल पाटील सर,अर्जुन जंजाळ सर,निरंजन पाटील सर,आजय लवंगे यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदीप गायके,गोपाल पाटील,अर्जुन जंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले.