<
पत्रकार बांधवांचा अवमान करणार्यावर कारवाईची मागणी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी यांना निवेदन
जळगाव – सोशल मिडीयावर पोस्ट करतांना पत्रकारां विषयी शिवराळ भाषेत अवमान करणार्या प्राध्यापकाचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधिक्षक यांना दि.13 ऑगस्ट रोजी देण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकार बांधवांना दिले. तसेच लवकरच राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रा. संदिप पवार यांच्या विरूध्द न्यायालयात मानहाणीचा दावा दाखल करण्यात येणार आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव ग्रामीण मतदार संघातील चांदरस येथील रहिवाशी प्रा. संदिप पवार यांनी व्हाटस् अप गृपवर पत्रकारांविषयी अतिशय शिवराळ भाषेचा वापर करून सर्व पत्रकार बांधवांचा अवमान केला आहे. पत्रकारांचा अवमान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचा अवमान आहे.पत्रकारांना शिवराळ भाषा वापरणार्या प्रा. संदिप पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, म.रा.पत्रकार संघ ग्रामीण जिल्हाध्यक्ष भुषण महाजन, जिल्हा संघटक भगवान मराठे, पाळधी शहर संघटनेचे ललित मोरे, उपाध्यक्ष शैलेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष चेतन निंबोळकर, महानगर सचिव दीपक सपकाळे, पत्रकार शैलेंद्र परदेशी, गोपाळ सोनवणे,सुनिल भोळे, संतोष ढिवरे, अरविंद मानकरी, दिपक साळवे, ज्ञानेश्वर पाटील, संदीप कुमावत यांच्यातर्फे करण्यात आली आहे.