<
कळंब | प्रतिनिधी
कळंब तालुक्यात आणखी 21 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी कळंब रुग्णालयातून 62 स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 21 पॉझिटिव्ह तर 26 निगेटिव्ह 7 अनिर्णित तर 8 पेंडींग असा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी कळंब शहरात 14, मंगरूळ गावात 6 तर देवधानोरा येथे 1 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूर्वीच्या रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नऊ जण पॉझिटिव्ह आले असून कळंब शहरातील मयत व्यक्तीच्या संपर्कातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कारोणाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर निलेश भालेराव यांनी केले.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला एकही ऍक्टिव्ह नसलेल्या कळंब तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, म्हणून चिंताही वाढली आहे.