<
जळगांव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) – वन महोत्सव कालावधीत शासकीय व निमशसकीय यंत्रणा, नागरिक व वृक्षप्रेमी यांना वृक्ष लागवड करण्यासाठी लागणारी रोपे वन विभागामार्फत माफक दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. असे जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी कळविले आहे.
जळगाव वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रोपवाटीकांची माहिती .
जळगाव वन विभाग, जळगाव
वनक्षेत्र-एरंडोल, रोपवाटीकेचे नाव-खडका, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव-धरणगाव, एरंडोल, वनक्षेत्र-वढोदा, रोपवाटीकेचे नाव-चारठाणा, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव- मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, वनक्षेत्र-वढोदा, रोपवाटीकेचे नाव-पिंप्रीपंचम, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव- मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, वनक्षेत्र – जळगाव, रोपवाटीकेचे नाव- वसंतवाडी, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव- जळगाव, जामनेर, वनक्षेत्र-मुक्ताईनगर, रोपवाटीकेचे नाव-निमखेडी, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव-भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, वनक्षेत्र-मुक्ताईनगर, रोपवाटीकेचे नाव-साळसिंगी, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव-भुसावळ, बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, वनक्षेत्र- पारोळा, रोपवाटीकेचे नाव- वाघ्रा, रोपे पुरवठा होणा-या तालुक्याचे नांव-अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा.
सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव अंतर्गत रोपवाटिकांचा तपशील
वनक्षेत्र तालुका चोपडा, रोपवाटीकेचे नांव-नारोद, बोदवड-साळसिंगी, रावेर-रावेर, यावल-यावल, खिरोदा, भडगाव-वलवाडी, भडगाव, पाचोरा-बिल्दी, भुसावळ-मुशाळतांडा, अमळनेर-पळसदरे, चाळीसगाव- बिलाखेड, जळगाव-मेहरुण, जामनेर-गंगापुरी, हिंगणे बु. एरंडोल-चोरटक्की, पारोळा-मोंढाळे.
तरी सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, नागरिक व वृक्ष प्रेमी यांनी वन महोत्सव कालावधीतील सवलतीच्या दराचा लाभ घेऊन रोपे वरीलप्रमाणे रोपवाटीकेतून प्राप्त करुन वृक्ष लागवड करावी. असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.