<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २४५व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २७० रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ७५५७ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ५५,(०२ RATI),भुसावळ ११,(०२RATI), अमळनेर ०७,(२१ RATI), चोपडा १६,(१० RATI),पाचोरा ०४, (००RATI), भडगाव १२,(०० RATI), धरणगाव ०३, (००RATI),यावल ०२, (००RATI), एरंडोल ०१,(००RATI), जामनेर १८,(१२RATI), जळगाव ग्रामीण १६,(०१RATI), रावेर ००, (०२RATI), पारोळा ००,(०५ RATI), चाळीसगाव २८,(०१RATI), मुक्ताईनगर ००, (१०RATI), बोदवड ००,(०५RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०१, (०० RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १११०३ इतकी झाली आहे.आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ५१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३०२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.