<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षक राहुल चौधरी व त्यांचे सहकारी प्रभात तडवी, मनोहर तेजवाणी, सुनील बडगुजर, संभाजी हावडे, संदीप सोनार, महेंद्र नेमाडे, भूषण महाले यांनी विशेष प्रयत्न करून जळगांव जि.प.शिक्षण विभागाच्या सहकार्याने या तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेस शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार यांनी पेड सुविधा उपलब्ध केली. शिक्षण विस्ताराधिकारीकिशोर वायकोळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर वेबिनारचे २ जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली असून आतापर्यंत विविध विषयांवर या वेबिनारचे १५ सेशन संपन्न झाले आहेत. त्यात ऑनलाईन अध्यापनासाठी उपयुक्त माध्यमांची माहिती शिक्षकांना देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन पाटील यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी.जे पाटील व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.एस. अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या संपूर्ण कार्यक्रमासाठी शिक्षण विस्ताराधिकारी विजय पवार व किशोर वायकोळे तसेच शिक्षक राहुल चौधरी व प्रभात तडवी यांनी या ऑनलाईन वेबिनार साठी विशेष प्रयत्न केले. या कार्यशाळेत संदीप सोनार यांनी झूम मीटिंग व गुगल फॉर्म, सुनीलकुमार बडगुजर यांनी विविध शैक्षणिक अँप व स्मार्ट पीडीएफ, भूषण महाले यांनी जिओ मिट, संभाजी हावडे यांनी युट्युब व गुगल टूल्स, मनोहर तेजवाणी यांनी पॉवर पॉइंट द्वारा व्हिडिओ निर्मिती, आनंद अानेमवाड यांनी अनिमेटेड व्हिडिओ निर्मिती, बालाजी जाधव यांनी कोरोना काळात १००% विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचता येईल याविषयी मार्गदर्शन केले. भूषण कुलकर्णी यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर व त्यासाठी वापरली जाणारी प्रणाली, महेन्द्र नेमाडे यांनी जिओ जेब्रा चा गणित अध्यापनात प्रभावी वापर, सुनीता लहाने यांनी गणित झाले सोपे झीरो बजेट नावीन्यपूर्ण उपक्रम, यजुर्वेद महाजन यांनी १० वी, १२ वी व पदवी नंतर पुढे काय ?, प्रतिभा भराडे यांनी मुलं नातेसंबंध व ज्ञानरचनावाद, तर शेवटचं समारोपीय सत्रात राहुल चौधरी यांनी टेस्टमॉझ विषयी मार्गदर्शन केले. प्रभात तडवी, मनोहर तेजवाणी, राहुल चौधरी यांचे कार्यशाळेस तांत्रिक सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यशाळेस जळगाव तंत्रस्नेही टिम चे सहकार्य लाभले. तर सर्व सहभागी शिक्षकांना ई प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.