<
कळंब, प्रतिनिधी
दि(8) रोजी दिवसभरात कळंब तालुक्यात 31 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, कळंब तालुक्यातील देि.(08) रोजी एकूण 87 जणांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी खामसवाडी मध्ये 5 रुग्ण, दहिफळ मध्ये 7 रुग्ण, मस्सा मध्ये 2 रुग्ण, पानगाव मध्ये 1 रुग्ण आणि चोराखळी मध्ये एक पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत. कळंब तालुक्यात रॅपिड अँटीजन्स टेस्टमध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तसेच कळंब तालुक्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्र प्रयोग शाळा उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या स्वाब नमुन्यांचे अहवाल दि(8) रोजी दुपारी प्राप्त झाले होते, त्यात 15 जण पॉझिटिव्ह सापडले होते. एकाच दिवसात 31 रुग्ण सापडल्याने कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच कोरोनाचे काल कळंब तालुक्यात दोन बळी गेले आहेत. भाटशिरपुरा येथील 66 वर्षीय व्यक्तीला इतर आजार असल्याने ते बार्शीला उपचारासाठी जात होते. तेव्हाच त्यांचा स्वब घेण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले, काल पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर चार दिवसांपूर्वी कळंब शहरातील 48 वर्षीय व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याचा स्वाब घेण्यात आला. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला, त्रास अधिक असल्याने या रुग्णाला उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
दिवसेंदिवस तालुक्यातील वेग वेगळ्या गावात रुग्णांची भर होत असून तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रसार आता खूप वाढला असून आता कळंब तालुक्यात अचानक दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत.