<
जळगांव(प्रतिनिधी)- तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या या झाडांची कदर केली जात नाही? वाढते तापमान, कमालीचा उकाडा, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती या सर्वाला आपणच जबाबदार आहोत.
याबाबत सविस्तर असे की, कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुप नायगाव ता.यावल यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त नायगाव ता.यावल येथील तडवी, भिल्ल आदिवासी दफनभूमी याठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला. सदर उपक्रम पोलीस बिनतारी संदेश विभागाचे सलीम तडवी यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने घेण्यात आला. यात कृती फाऊंडेशनच्या वतीने पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, चेतन निंबोळकर वनीकरण विभागाच्या सौ, साळुंखे यांनी इन्सानियत ग्रुपला ऑक्सिजन देणारे रोपे सुपूर्द केली. नंतर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून इन्सानियत ग्रुप ने त्या रोपांची पुजा करत गावात वृक्ष दिंडी काढून नायगाव येथील तडवी भिल्ल दफन भूमी, रस्त्यांच्या कडेला, माळरान येथे पोलिस बिनतारी संदेश विभागाचे सलीम तडवी, पुरवठा अधिकारी रशिद एदबार तडवी, इमाम ईसा मेहबूब तडवी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेे. सदर उपक्रम शासनाने आखून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात आला. या उपक्रमाला कृती फाऊंडेशन सचिव जी.टी.महाजन, कार्यध्यक्षा डॉ.श्रद्धा माळी, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, स्वामी समर्थ ग्रुप संचालिका प्रतीक्षा पाटील, चेतन निंबोळकर,राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, मनपा माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी, नितीन सपके यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रसंगी इन्सानियत ग्रुपच्या सदस्यांसह हजरत जंगेखा अकबर तडवी, सलीम तडवी, पुरवठा अधिकारी रशीद तडवी, खलील तडवी, तुकडू तडवी, नजीर तडवी तसेच गावकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी शेताचे बांध, नदीचे काठ आणि पडीक जमिनीवर फळे तसेच वनवृक्षांची लागवड करावी. आपण फळझाडांची लागवड करताना किमान तीस टक्के वनवृक्षांची लागवड करावी यामुळे पशुपक्षी यांचे संगोपन होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. जैवविविधता सुरक्षित राहील. त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास उपलब्ध झाल्यामुळे शेतीचा धोका टळेल असा अनोखा संदेश पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी सलीम तडवी यांच्यावतीने गावकऱ्यांना देण्यात आला.तर, परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच आता वर्षभर विविध सण-समारंभ वा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण केले जात आहेत. यापुढे मात्र रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आह यासाठी जिल्ह्यातील विविध दफनभूमी येथे वृक्षारोण आणि संवर्धन करणार असल्याचे.कृती फाऊंडेशनचे सचिव जी टी महाजन यांनी बोलतांना सांगितले.