<
जळगाव :जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ४५६ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २८५रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ९८७३ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २१,(५६RATI),भुसावळ १२,(०३ RATI), अमळनेर २५,(७१ RATI), चोपडा २८,(२८ RATI),पाचोरा १९, (१४RATI), भडगाव ०१,(१२ RATI), धरणगाव ००, (२७RATI),यावल ००, (०४RATI), एरंडोल ०१,(१७RATI), जामनेर ०२,(२९RATI), जळगाव ग्रामीण १०,(०४RATI), रावेर ०३, (१५RATI), पारोळा ०२,(२२ RATI), चाळीसगाव ०८,(०१RATI), मुक्ताईनगर ००, (१३RATI), बोदवड ०१,(०५RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०२, (०० RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १४३४३ इतकी झाली आहे.आज ०७रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ६०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.