<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या संरक्षणासाठी उतरलेल्या पोलिसांचा देखील सर्व घटकांइतकाच महत्वाचा वाटा आहे. पोलीस बांधव जसे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आयुष्याची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. आपली काळजी घेत आहेत. तशीच आपण देखील त्यांची काळजी घेतली पाहीजे, हा उदात्त हेतू ठेऊन कृती फाऊंडेशन ठाणे टीमच्या वतीने भायखळा कारागृह व भायखळा विश्रामगृह येथे सँनिटायझर वाटप करण्यात आले. सदर उपक्रम ACPW किशोर उतळे, कृती वेल्फेअर ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष शेखर महाजन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कृती फाऊंडेशन ठाणे टीमचे कपिल महाजन, जळगांव पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांच्या संकल्पनेतून सुभाष ढवळे यांच्याकडे सँनिटायझर सुपूर्द करण्यात आले. सदर उपक्रमाला कृती फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी.महाजन, माजी अध्यक्ष डी.टी.महाजन, सद्गुरु सेवा मंडळाचे भारती चौधरी, जगदीश तळेले, प्रा.नारायण पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. कोरोना विरोधी लढ्यात लढताना अशा विविध समाजिक संस्थांकडुन मिळालेल्या सहकार्याने आमचे मनोबल वाढत असुन आपण सर्वजण मिळुन निश्चित कोरोनावर विजय मिळवू असे उद्गार ACPW किशोर उतळे यांनी काढले. प्रसंगी वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री.भवर यांच्यासह पो.हे.कॉ. संजय चौधरी, बळी पाटील, रतन गढरी, सुभाष ढवळे, श्री.गायकवाड, विलास शिंदे, मशाल मेजर आदी उपस्थित होते.