<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 – नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत, जळगाव जिल्ह्यातील 460 गावांमध्ये 6 वर्ष कालावधी (सन 2018-19 ते 2023-24) पर्यंत कृषि व्यवसाय स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी/संघ व प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गट प्रस्ताव सादर करु शकतात. या प्रकल्पातंर्गत अनुदानावर प्रकल्प कार्यरत झाले असून प्रकल्प उभारणीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क करुन अधिक माहिती घेता येईल.
उपविभाग पाचोरा – तालुका भडगाव, प्रस्ताव सादर करणारे एफपीओ/एफपीसी/एसएचजी चे नाव रजनीताई देशमुख फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. टोणगाव, प्रस्तावाचा विषय स्वच्छता व प्रतवारी, धान्यप्रक्रिया बांधकाम व सौर उर्जा केंद्र उभारणी, प्रस्तावाचे मुल्य रक्कम रुपये 98 लाख 84 हजार, देय अनुदान रक्कम रुपये 51 लाख 84 हजार, सद्यसि्थतीत प्रकल्प कार्यरत झाला आहे. श्री. नानासाहेब बबनराव देशमुख, मोबाईल नं. 7796777172 वर संपर्क साधावा.
उपविभाग पाचोरा- तालुका जामनेर, भूमिका शेतकरी गट, बेटावद बु. गोदाम बांधकाम, प्रस्तावाचे मुल्य रक्कम रुपये 83 लाख, देय अनुदान रक्कम रुपये 49 लाख 39 हजार, सद्यस्थितीत प्रकल्प कार्यरत झाला आहे. श्री. स्वप्निल कृष्णा पाटील, मोबाईल नं. 9423715972 यांचेशी संपर्क साधावा.
उपविभाग अमळनेर- तालुका चोपडा, माऊली केळी व कापूस उत्पादक शेतकरी बचत गट, तावसे खु. प्रस्तावाचा विषय हळद प्रक्रिया उद्योग, प्रस्तावाचे मुल्य रक्कम रुपये 13 लाख 73 हजार, देय अनुदान रक्कम रुपये 8 लाख 23 सद्यस्थितीत प्रकल्प कार्यरत झाला आहे. श्री. विवेक राजाराम पाटील, मोबाईल नं. 9403097678 वर संपर्क साधावा.
उपविभाग अमळनेर – तालुका पारोळा, जय बालाजी शेतकरी गट, लोणी खु. प्रस्तावाचा विषय भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र, प्रस्तावाचे मुल्य रक्कम रुपये 19 लाख 50 हजार, देय अनुदान रक्कम रुपये 11 लाख 70 हजार, सद्यस्थितीत प्रकल्पाची खरेदी प्रक्रिया चालू आहे. श्री. प्रमोद आनंदा पाटील, मोबाईल नं. 9423769433 वर संपर्क साधावा.
उपविभाग अमळनेर- तालुका धरणगाव, भोलाई माता शेतकरी गट, बिलखेडा. प्रस्तावाचा विषय भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र, प्रस्तावाचे मुल्य रक्कम रुपये 12 लाख 3 हजार, देय अनुदान रक्कम रुपये 7 लाख 20 हजार, सद्यस्थितीत प्रकल्पाची खरेदी प्रक्रिया चालू आहे. श्री. श्रीकृष्ण भगवान काटे, मोबाईल नं. 9370137781 वर संपर्क साधावा.
उपविभाग जळगाव – तालुका जळगाव, दुर्गा माता शेतकरी स्वयं सहाय्यता गट, भादली बु. प्रस्तावाचा विषय भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र, प्रस्तावाचे मुल्य रक्कम रुपये 18 लाख 84 हजार, देय अनुदान रक्कम रुपये 11 लाख 30 हजार, सद्यस्थितीत प्रकल्पाची खरेदी प्रक्रिया चालू आहे. श्री. मिलिंद दत्तात्रय चौधरी, मोबाईल नं. 9096675777 वर संपर्क साधावा. याप्रमाणे जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना अनुदान देण्यात आलेले आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट (शेतकरी गटाचे गांव पोकरा योजनेत असावे) यांनी गोदाम बांधकाम, औजारे बँक, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, पशुखाद्य युनिट (मुरघास युनिट), शेतमाल प्रक्रिया युनिट 60% अनुदानावर देता येतात. तरी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.