<
भडगाव(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील तांदुळवाडी रेल्वे गेट हे वडाळा- वडाळी, मळगाव, न्हवे, ढोमने, तारवाडे, भोरस या गावातील वाहनधारकांचा मुख्य रस्ता असून तांदुळवाडी रेल्वे गेट साधारणतः दोन महिन्यांपासून बंद असल्याने छोट्या-मोठ्या वाहनधारकांना व शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा मुख्य रस्ता असल्याने त्या भुयारी पुलामध्ये साधारणतः दोन ते अडीच फूट पाणी असल्याने त्या भुयारी मार्गाखाली ये-जा करणाऱ्यांना जीवाशी खेळावं लागत आहे. त्या भुयारी पुलामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असल्याने व वळण असल्याने काही वेळेस वाहनधारकांचा अपघात देखील झाला आहे व परिसरातील शेतकऱ्यांना डोक्यावर ओझे घेऊन रेल्वे रूळ पार करावा लागत आहे. तसेच गुर-ढोरांना देखील रस्ता नसल्या कारणाने रेल्वे रुळावरून जावं लागतं आहे. अश्या काही अपघाती समस्यांना शेतकऱ्यांना व वाहनधारकांना आणि गुर-ढोर मालकांना या समस्स्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी भुयारी रस्त्याचे ठेकेदाराने त्या मार्गाचा त्वरित पूर्णपणे काम करून व वाहनधारकांना व शेतकऱ्यांसाठी त्या कालावधीपूरता रेल्वे गेट चालू करण्यात यावे अशी मागणी परिसरातून शेतकऱ्यांची व वाहनधारकांची होत आहे. तरी या अश्या काही अपघाती समस्यांना परिसरातील लोकांना तोंड दयावे लागत आहे. तरी शासनाने त्या स्थळावर भेट देऊन त्वरित त्या कामास मार्गी लावावे असे शेतकरी व वाहनधारकांंकडून मागणी होत आहे.