<
जळगांव(प्रतिनिधी)- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व कार्याध्यक्ष विलासराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी ९ ऑगस्ट कांतीदिनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करणे या उद्दिष्टाने जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली. संस्थेच्या कार्यकारिणीवर ” वसुंधरा हरित शिक्षक पुरस्कार ” प्राप्त शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांची जिल्हा सहसचिव पदी नियुक्ती केल्याचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. पर्यावरणप्रेमी उपक्रमशील तथा साहित्यिक विजय लुल्हे हे तरसोद ता. जळगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लुल्हे यांनी बऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावर बिजारोपण अभियान, सुकन्या सुवर्णा व समिक्षा यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण व ट्रि गार्डस् भेट, जागतिक वन दिनानिमित्त स्मशानभूमी व अन्य सार्वजनिक परिसरात वृक्षारोपण, वडाची रोपे महिला बचत गटांना वृक्षदान, जागतिक शिक्षणतज्ञ डॉ. जे.पी. नाईक जयंती दिनी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या घरासमोर वृक्षारोपण व संगोपन जबाबदारी कार्यक्रम राबविले आहेत. शाळू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती निर्मिती कार्यशाळा, गणपती विसर्जनस्थळी निर्माल्य दान संकलन, प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेमुक्त अभियान, पर्यावरणपुरक होळी कृती कार्यक्रम अभियान, इंधन वाचवा – पर्यावरण वाचवा, विविध पर्यावरण दिन साजरे करुन जनजागृती असे अनेकविध कार्यक्रम यशस्वी केले आहेत. जळगावच्या सुप्रसिद्ध समर्पण संस्था आयोजीत वसुंधरा आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सव अंतर्गत शालेय व कॉलेजस्तरीय पर्यावरणावर आधारीत परीक्षा घेणे, कॉलेजात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखविणे, पोस्टर्स प्रदर्शन, प्रचार व प्रसार समितीची धुरा त्यांनी कार्यतत्परतेने सांभाळली आहे . पर्यावरण शाळा अंतर्गत रक्तचंदन वृक्षसंवर्धन व लागवड अभियान , निर्माल्य दान उपक्रम तसेच सातपुडा बचाव कृती समितीतर्फे सातपुडा जंगलातील भीषण जंगलतोडीवर उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, यावल अभयारण्याला वन्यजीव अधिवास धोकाक्षेत्र घोषित करावे व त्याआधी आदिवासींचे पुनर्वसन करावे यासाठी मागणी, शिवाजी उद्यान व श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान पक्षी विहार क्षेत्र घोषित करणे , मेहरूण तलाव परिसरात वृक्षतोड करणाऱ्याला अटक करणेसाठी निवेदन, नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन, शिवाजी उद्यान समिती अशा विविध रचनात्मक कार्यक्रमांमध्ये लुल्हे सक्रिय सहभागी होते . अभ्यासक मिलिंद भारंबे निर्मित निसर्ग व पर्यावरणप्रेमी व्यक्ति व संस्थांची सूची यासाठी लुल्हे यांनी संपादन सहकार्य केले आहे. विजय लुल्हे यांना पर्यावरण शाळेचे अध्वर्यू राजेंद्र नन्नवरे, संजय भावसार, चेतना नन्नवरे, वन्यजीव संरक्षण संस्थाध्यक्ष बाळकृष्ण देवरे, उडान पक्षीमित्र संघटनेचे अश्वीन कुमार पाटील, चातक नेचर संस्थेचे अध्वर्यू पक्षीतज्ञ अनिल महाजन, ज्येष्ठ निसर्गतज्ञ व वन्यजीव अभ्यासक तथा संशोधक अभय उजागरे, पक्षीमित्र केशरबाई उपाध्ये, ज्येष्ठ सर्पतज्ञ राजेश ठोंबरे, गणेश सोनार, विवेक देसाई, वासुदेव वाढे, वृक्षमित्र दत्तात्रेय तावडे, एम. टि.लुले साहेब, मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशन अध्यक्ष फिरोज शेख, मुक्त पत्रकार तुषार वाघुळदे, ललित कला केंद्र प्राचार्य राजेंद्र महाजन, शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली जिल्हा प्रतिनिधी धृवास राठोड, पर्यावरणप्रेमी लेखक दिपक तांबोळी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. दिगंबर कट्यारे, सत्यशोधकी साहित्य परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, उमेश इंगळे यांचे अमूल्य सहकार्य व प्रोत्साहन मिळत असते . लुल्हे पक्षीतज्ञ किरण पुरंदरे व कै. दिलीप यार्दी तसेच पर्यावरणप्रेमी यांच्या मुलाखती घेऊन लेख लिहीले आहेत. महापक्षी गणनेतही त्यांनी सहभाग नोंदविला आहे. लुल्हे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आजीव सदस्य आहेत. सहसचिव पदी नियुक्ती झाल्याप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.