<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
फत्तेपुर परिसरातील नागरिकांसाठी आज रोजी फत्तेपुर ग्रामपंचायत सभागृहात कोरोना चाचणी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. तरी ज्या नागरिकांना ताप, अंगदुखी,खोकला, अशक्तपणा,डोकेदुखी, डायरिया,वास न येणे, चव न लागणे, भूक न लागणे इ.लक्षणे असणारे तसेच मेडिकल स्टोअर्स मालक कामगार, किराणा दुकानदार, रक्त तपासणी करणारे, कृषी दुकानदार, सलून दुकानदार, रेशन दुकानदार, वृत्तपत्र विक्रेते, खाजगी डॉक्टर्स, भाजीपाला विक्रेते, चक्कीवाले, हॉटेल मालक कामगार, दूध विक्रेते,पान टपरी धारक, अधिक जनसंपर्क असणारे नागरिक, राजकीय पदाधिकारी यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले होते.
त्याप्रमाणे आज कॅम्प मध्ये एकूण 138 संशयितांची तपासणी करण्यात आली या पैकी 11 पॉसिटीव्ह आढळून आले.
शिबिर प्रसंगी प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार एवं तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे यांनी स्वतः भेट देऊन कोरोना बाबत आढावा घेतला.
खाजगी डॉक्टरांच्या सहकार्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रसंगी तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.मनोज तेली,डॉ.योगेश राजपूत डॉ श्यामल इंगळे ,
डॉ किरण धनगर ,डॉ सागर पाटील-सोनाळकर ,
डॉ. अंजली गायकवाड डॉ. धनंजय राजपुत डॉ पुरुषोत्तम पाटील अशी तालुक्यातील टीम,गटप्रवर्तक रेखा तायडे, सुनीता पाटील सर्व आशा स्वयंसेविका यांची उपस्तीथी होती.
तसेच गावातील डॉ.विशाल पाटील,डॉ. पराग चौधरी,डॉ.प्रदीप दोडे, डॉ.प्रमोद पाटील,डॉ.पद्माकर पाटील,डॉ.सुराजसिंग पाटील, डॉ.युवराज पाटील,डॉ.एम आर पाटील,डॉ.अरुण चौधरी,डॉ.अरुण फिरके इ सर्व खासगी डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे गावातील सरपंच सुधाकर पाटील ,संजय चौधरी ,रवींद्र भन्साळी,उपसभापती एकनाथ लोखंडे,ग्रा.प.सदस्य मुन्नाशेठ बंब,रमेश भोळे आदी ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.