<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग.स.पतपेढीचे माजी उपाध्यक्ष के.पी.चव्हाण, उपमुख्याध्यापक के.एम.विसावे सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एन.एच.बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या देशाचे राष्ट्रगीत व झेंडा गीत व आपला भारत देश चिरायू होवो च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे पी.टी.शिक्षक आर.एन.पाटील केले.
या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी कोरोना या महामारीच्या प्रसंगी सरकारी आदेशाचे पालन करून एन.सी.सी. स्काऊट गाईड विभाग प्रमुख तसेच ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.