<
गणेशोत्ववाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील व शहरातील श्री गणेश मंडळाच्या पदाधिकार्याचीं बैठक भडगांव पोलिस स्टेशन येथे रविवारी पाच वाजता पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीला बाविस श्री मंडळ व पत्रकार उपस्थित राहिले. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक खाजगी गणेश मंडळासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत त्या बाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकाची माहीती पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी श्री गणेश उत्सव मंडळांना दिली. सार्वजनिक गणेशोत्सवासीठी या वर्षी स्थांपन करण्यात येणारी मुर्ती शक्यतोवर कमीतकमी उंचीची या मुर्तीची उंची चार फुटापेक्षा अधिक असणार नाही याची हमी तसेच सामाजिक अंतर , सोशल डिस्टंसिंग नियमांचे सपुर्ण पणे पालन , मंडपात वावरणारा प्रत्येक कार्यकर्ता व्यक्ती यांनी मास्कं लावणे बंधन कारक असेल , मंडपात एका वेळी पाच पेक्षा जास्तं कार्यकर्ते राहणार नाही , मंडपाचे मुख्यं भागाचे दिवसातुन तिन वेळा निर्जुंतीकी करण करून करणे तसेच कार्यकर्ते व ईतर व्यक्ती यांना वापरासाठी सँनिटायझर उपलब्धं करून देणे या बाबत भडगांव पोलिस निरिक्षक यांनी श्री गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना सुचना केल्या आहेत .