<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील भरारी फाऊंडेशनच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी रुग्णांची घरासारखी पण वैद्यकीय सल्यानुसार काळजी घेतली जाते.
अशातच यात मदत म्हणून कृती फाऊंडेशनच्या वतीने आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरिक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अबाधित व वाढविण्याच्या तसेच मानवी शरीरावर होणाऱ्या संभाव्य आजारांवर प्रतिकारक व प्रभावी उपाय या उद्देशाने व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आयुष काढा व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर आणि जसे कोरोना पासून स्वसुरक्षेसाठी आपण मास्क व सॅनिटायझर वापरतो अगदी तसेच कोविड केअर सेंटरच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हाइपोक्लोराइट देखील देण्यात आले. प्रसंगी, कृती फाऊंडेशन तर्फे जळगाव पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, चेतन निंबोळकर यांनी भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी यांना सदर सॅनिटायझर, आयुष काढा व सोडियम हाइपोक्लोराइट हे सुपूर्द केले. सदर उपक्रमाला जळगाव पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आय.आय.तडवी, दिपक पुजारी, सलीम तडवी, विजय बुंदेले यांचे सहकार्य लाभले तर डॉ.श्रद्धा माळी व डॉ श्रेयस महाजन यांनी ते उपलब्ध करून दिले. प्रसंगी वैशाली पाटील, आशा फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी, भरारी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.