<
पाळधी/धरणगांव(प्रतिनिधी)- येथील नोबल इंटरनॅशनल च्या विद्यार्थ्यांनी बनवले ऑनलाईन पर्यावरणपूरक गणपती सध्या कोरोना महामारी मुळे सर्व शाळा बंद आहेत. लहान मुलांना शाळा हेच हक्काचे व्यासपीठ त्या सर्व सण उत्सव ते आपल्या शाळेत साजरा करत असतात त्यातलाच एक आवडीचा सण गणपती उत्सव यावर्षी कोरोना मुळे एकत्र जरी साजरा करू शकत नसलो तरी मुलं सध्या ऑनलाईन च्या माध्यमातून सहभागी होत असतात. नोबल शाळेचे शिक्षकवृंद ही मुलांना सोबत सहभागी होऊन विविध सण साजरे करत असतात. यावेळेस मुलांनी गव्हाच्या कनकेपासून गणपती तर कुणी शाळु मातीचे असे वेगवेगळे गणपती बनवून साजरा केला. त्यात शाळेचे शिक्षक विजया मोरे, सरस्वती जोशी, सुवर्णा चौधरी, राधिका उपाध्याय यांनी सहकार्य केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षिस म्हणून शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी यांच्या हातून वाटप करण्यात येणार आहे.