अमोल दिलीपराव पाटील यांना राष्ट्रवादी पदविधर संघ ,प्रदेश अध्यक्ष मा. सुनिल पाटील साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या भडगांव तालुका अध्यक्ष पदी नेमणुक करण्यात आली आहे तालुक्यातील जास्तीत जास्त पदवीधर तरूणाईला संघटीत करून पक्ष वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यां पर्यन्त पोहचविण्या साठी तसेच पदवीधरांच्या उन्नंती व विकास साठी सहकार्य असेल व राहील.
माजी आमदार श्री दिलीपभाऊ वाघ यांच्या आशीर्वादाने, श्री.शेषराज दादा पाटील यांच्या प्रयत्नाने, प्रदेशाध्यक्ष सुनील दादा पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष श्री. पुंडलिक दादा पाटील यांनी नियुक्ती केली.
माजी आमदार श्री.दिलीपभाऊ वाघ यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून तालुका अध्यक्ष श्री.संतोष भाऊ जाधव तसेच तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाऊंच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले
राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या भडगांव तालुका अध्यक्ष पदी निवडी बद्दल अमोल पाटील यांना सर्व दुरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .