जळगांव(प्रतिनिधी)- छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते तथा ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मोरे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नियुक्तीपत्रांन्वये ही नियुक्ती केली. नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, महानगराध्यक्ष भैय्या पाटील, महानगर सरचिटणीस राहुल नेवे, मुकुल सोनवणे, आबू सुफीयन बागवान, भैय्या सोनवणे, रोहन देशमुख, सोनु परदेशी व संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सदर नियुक्ती बद्दल संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, राहुल सोनवणे, मुकुंद सपकाळे, विनोद देशमुख, सचिन धांडे, अजय गांधी, अँड. बिपिन पाटिल यांनी अभिनंदन केले.